Home Uncategorized कोरोना पाश्वभूमीवर लाईफ डेव्हलपमेंट सोसाईटीचा पुढाकार

कोरोना पाश्वभूमीवर लाईफ डेव्हलपमेंट सोसाईटीचा पुढाकार

अमरावती
हिवाळयाची चाहुल व कोरोनोचा कहर या बाबींवर लक्ष केंद्रित करुन लाईफ डेव्हलपमेंट सोसाईटी अमरावती ने एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत गरजवंत, निराश्रीत, दिव्यांग, दृष्टीबाधीत व महीलांना उबदार ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

मार्डी मार्गावरील अँनिमेशन कॉलेज येथे आयोजीत कार्यक्रमात लाभार्थ्यांचे निरजंतुकिकरण केले आणि शिस्तबध्द पद्धतीने सर्वाना रांगेत बसविण्यात आले कोरोना संसर्गा विषयी जनजागृती
करण्या करीता सोशल डिस्टन्सिंगचे पालन, नियमित सैनीटायझर किंवा साबणाने हात धुणे, मास्क चा वापर, गर्दीत जाणे टाळाणे व यातुन कोरोना प्रकोप लक्षणीय नियंत्रणात राहतो, यावर शैलेश भगत यांनी समुपदेशन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया यांनी लाभार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले उपेक्षित व दिव्यांगाची सेवा म्हणजेच परमात्म्याचा अनुभव आहे असे म्हंटले. यावेळी चंद्रकुमार जाजोदिया यांनी दिव्यांग लाभार्थ्यांचा जवळ जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

महिलांना स्वयंमरोजगारातुन अर्थप्राप्ती याविषयी त्यांचे अमरावती करीता व्हिजन यावरचंद्रकुमार जाजोदिया यांनी सविस्तर प्रकाश टाकला .हरिना फॉंऊडेशन अवयवदान समितीचे संयोजक चंद्रकांट पोपट यांनी गरजवंताची सेवा करत असतांना प्रत्येकाने हे कर्तव्य समजुन आपण संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण प्रत्यक्षात राबवित असतो याचे भान ठेवत त्याचा आदर्श नेहमी आत्मसात करावा असे आवाहन केले . समाजभिमुख कार्यात अनेक सेवावृत्तीचे लोक संस्थेला योगदान देत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे असेही ते म्हणाले
श्री लप्पीभैया जाजोदिया, अँनिमेशन कॉलेजचे संचालक प्रा.विजय ऱाऊत चंद्रकांत पोपट प्रा. प्रमोद कुमार, धंनजय बंड, लाईफ डेव्हलपमेंट सोसाईटीचे सचिव नरेंद्र गुलदेवकर, शैलेश भगत यांचे हस्ते लाभार्थींना ब्लॅंकेट वितरण करण्यात आले.
लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे विनोद गुलदेवकर, अजय शृंगारे, जगदीश गुप्ता, संजय तायडे, सागर डोंगरे, प्रसाद माहोरे, दिपक वाघमारे, शुभम धुलंदरे, प्रकल्प समन्वयक श्वेता मलिये व कल्याणी गुलदेवकर आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments