Home विदर्भ चांदुर बाजार नगराध्यक्षपदी नितीन कोरडे यांची निवड; नगरपालिकेवर प्रहारचा झेंडा

चांदुर बाजार नगराध्यक्षपदी नितीन कोरडे यांची निवड; नगरपालिकेवर प्रहारचा झेंडा

अमरावती
स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची वर्णी लागली. त्यांना प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस, व अपक्ष अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजप चे गोपाल तिरमारे याना ८ मतं मिळाले. विशेष म्हणजे पालिकेत भाजप चे सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले.
नगराध्यक्ष रविंद्र पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पोटनिवडणुक घेण्यात आली. भाजप तर्फे गोपाल तिरमारे तर प्रहार गट तर्फे नितीन कोरडे यांनी अर्ज दाखल केले होते. पालिकेचे संख्याबळ पाहता भाजप ७, प्रहार ४, राष्ट्रवादी काँग्रेस चे २, अपक्ष ४ असे आहे. यात दिवंगत नगराध्यक्ष रविंद्र पवार हे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र त्यांचा निधनानंतर रिक्त जागेवर आज झालेल्या निवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची ९ नगरसेवकांचे समर्थनाने निवड झाली. तर भाजपचे गोपाल तिरमारे याना ८ मते मिळाली.

नितीन कोरडे याना प्रहार चे सरदार खा, फातिमा बी, उषा माकोडे, वैशाली खोडपे, राष्ट्रवादि काँग्रेस चे आबीद हुसेन, चदा खंडारे, तसेच अपक्ष नगरसेवक लविना अकोलकर, नजीर कुरेशी अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजप चे गोपाल तिरमारे याना अतुल रघुवंशी, विजय विल्हेकर, टिकू अहिर, मीना काकडे, मीरा खडसे, वैशाली घुलक्षे सह अपक्ष मनीष नांगलिया यांची ८ मते मिळाली. नितीन कोरडे यांचा विजय जाहीर होताच प्रहार कार्यकात्यानी एकच जल्लोष केला.

दिवंगत रवींद्र पवार यांना वाहिली श्रद्धांजली

नवनिर्वाचित नगराध्यक्ष नितीन कोरडे व त्यांचा गटातील नगरसेवकांनी निवड होताच दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार यांचा फोटो त्यांचा खुर्ची वर ठेवूनप्रतिमेचे पूजन केले. यावेळी नितीन कोरडे सह नगरसेवकांनी रवींद्र पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments