Home ताज्या घडामोडी  श्रीकांत देशपांडेंना निवडून आणा आणि ताठ मानेने 'वर्षा'वर या

 श्रीकांत देशपांडेंना निवडून आणा आणि ताठ मानेने ‘वर्षा’वर या

                    खासदार विनायक राऊत यांनी केली शिवसैनिकांची कानउघाडणी

अमरावती

राज्यातील शिवसेनेच्या सर्व शाखा पदाधिकारी, सदस्यांना वर्षा बंगल्यावर सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जाणार आहे. सध्या मुंबईतील शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचा बांगला पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. काही दिवसात अमरावतीच्या शाखांना निमंत्रण मिळेल. खरं तर अमरावतीत गटाताटामुळे शिवसेनेची वाट लागली असे चित्र आहे. हे चित्र बदलायला हवे. आता गट-तट विसरून आपल्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना निवडून आणा आणि सन्मानाने ‘वर्षा’ वर या असे आवाहन शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले.

 

एकेकाळी शिवसेनेचा गड अशी ओळख असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात पक्षाची पूर्ती वाताहत झाली असताना शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पक्षाचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना निवडून आणणे हे शिवसेनेने प्रतिष्ठेचे आले असून जिल्ह्यात जवळपास संपुष्टात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास पाठवले. गुरुवारी शहरातील ग्रेस इन हॉटेल येथे शिवसेनेच्या पदाशिकाऱ्यांची कानउघाडणी व्हावी या उद्देशाने विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीला संबोधित करताना खासदार विनायक राऊत म्हणले, अमरावती जिल्हा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आजोळ. आज अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असताना एकही आमदार जिल्ह्यात नाही. जिल्हा परिषद, महापालिका, ग्राम पंचायतमध्ये सुद्धा शिवसेना नाही दुर्दैवाने आज अमरावतीत औषधीलाही शिवसेना उरली नाही याचे दुःख वाटते.आता पक्षाने अमरावतीत 10 जिल्हाप्रमुख द्यायला हवेत का असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला.

अमरावतीत पक्षात असणाऱ्या विविध गटातटांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्रस्त आहेत. आज श्रीकांत देशपांडे यांचा विजय पक्षासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे आता गटतट सारं काही विसरून कमला लागा. आपल्या घराच्या परिसरातील शिक्षक, आपल्या शहरातील, गावातील सर्व शिक्षकांपर्यंत पोचणे ही सर्व शिवसैनिकांची जबाबदारी आहे. श्रीकांत देशपांडे यांच्यासाठी विजय खेचून आणा आणि छाती ठोकून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला या असे खसदर विनायक राऊत म्हणाले.
यावेळी अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

माजी मुख्यमंत्री चवताळले

सत्ता गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री चवताळले आहे. देशात एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांची अशी अवस्था होणे हे पहिलेच उदाहरण आहे असा टोला खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.

लोकसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक

खोटे कागदपत्र लावून नवनीत राणा अमरावतीच्या खासदार झाल्या असल्या तरी आता त्यांचा खोटारडेपणा अधिक काळ टिकणार नाही. लवकरच खरं ते समोर येणार असून अमरावती लोकसभा मतदार संघात पोटणीवडणूक जाहीर होणार असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments