Home ताज्या घडामोडी शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

अमरावती

पक्षाशी बंडखोरी करून गुरूंना विकत घेण्याचा प्रयत्न करणायचे काम करणाऱ्या शेखर भोयर या व्यक्तीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी अकोला येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर केले.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निबंडणुकीत शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीकांत देशोपांडे निवडणूक लढवीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सदस्य असणारे शेखर भोयर हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान अकोला येथे आयोजित निवडणूक प्रचार कार्यक्रमात जयंत पाटील यांनी शिक्षकांना अडचणीत आणण्यासाठी जे करू नये असं सगळं करणारा उमेदवार आशा शब्दात शेखर भोयर यांचा उल्लेख करीत गुरूंना प्रलोभन देण्याचे काम करीत असल्याचे म्हंटले आहे. गुरूंना प्रलोभन देणे आणि गुरुदक्षिणा देणे यात जमीन आसमनचा अंतर आहे. शिक्षकांना असे विकत घेणाऱ्या कुणीतरी शेखर भोयर या व्यक्तीला आमच्य पक्षातून कडून टाकण्याचे काम आम्ही आज सकाळीच केलं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकदा निर्णय झाल्यावर कुणी निर्णयाविरुद्ध वागत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या शेखर भोयर यांना पक्षातून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र प्रसिद्धी माध्यमांना पाठविले आहे

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments