Home ताज्या घडामोडी एकाच कुटुंबातील 5 जण जखमीट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार;

एकाच कुटुंबातील 5 जण जखमीट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार;

अमरावती
अमरावती- नागपूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या लाकडाच्या ट्रॅक्टरवर नागपूरवरून अमरावती कडे जाणारी भरधाव स्विफ्ट कार धडकली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झालेत. .

   

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील दातीर कुटुंबीय हे मोझरी मार्गे हायवेने अमरावती कडे एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात स्विफ्ट कार क्रमांक  MH 36,H-6218 ने जात असताना अचानक गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी फाट्यावरून लाकडाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक MH-27,D-6395 हा हायवे ओलांडत असतांना सदर ट्रॅक्टरवर भरधाव स्विफ्ट कार धडकून अपघात झाला.ज्यामध्ये कार मधील रविंद्र किशोर दातीर(वय 58,रा.लाखनी,जि. भंडारा),वनिता रविंद्र दातीर(वय 52),अथर्व रविंद्र दातीर(वय 17),अंकिता रविंद्र दातीर(वय 28),वैभव मुकेश दातीर(वय 22,रा.जरूड) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच ठाणेदार राजेश पांडे, रोशन नंदरधने,सुनील बनसोड,अरविंद गावंडे,खंडारे, दीपक सोनाळेकर हे घटनास्थळी दाखल पोचले. अपघातातील ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments