Home ताज्या घडामोडी खुद्द जिल्हाधिका-यांनी पाठविला करोना रिपोर्ट

खुद्द जिल्हाधिका-यांनी पाठविला करोना रिपोर्ट

अमरावती

करोना रिपोर्टला विलंब होत असल्याने अस्वस्थ झालेल्या मेडिकलच्या एका विद्यार्थीनीने थेट जिल्हाधिका-यांना व्हाॅट्स अँप मॅसेज केला व अवघ्या अर्ध्या तासात खुद्द जिल्हाधिका-यांनी वैयक्तिकरित्या विद्यार्थीनीला करोना रिपोर्ट पाठवला.या प्रसंगातून जिल्हाधिका-यांच्या संवेदनशीलतेचा परिचय अमरावतीकरांच्या प्रत्ययास आला आहे.
बंगलोरच्या वैद्यकिय महाविद्यालयाची विद्यार्थिनी मैत्रेयी पांडे हिचे एक डिसेंबरपासून काॅलेज सुरू होत आहे.काॅलेज होस्टेलला राहण्यासाठी कोविड चाचणी अत्यावश्यक करण्यात आली आहे.अमरावतीकर असलेल्या मैत्रयीने बुधवार 25 नोव्हेंबरला

विलासनगर सेंटरवर कोविड चाचणी केली. चाचणीचा अहवाल दोन दिवसांनी इर्विन येथून मिळेल,अशी सूचना सेंटरवर लावण्यात आली होती.त्यानुसार शनिवार 28 रोजी सकाळी दहा वाजता वडिलांचे मित्र इर्विन येथे अहवाल घ्यायला गेले तर अहवाल इर्विनकडे नव्हता.रिपोर्टसाठी दुपारी येऊन बघा.नाहीतर सोमवारी येईल.असं इर्विनच्या कर्मचा-याने सांगितले.अहवाल आज मिळणार नाही.उद्या सकाळी नागपूरहून विमानाने बंगलोरला गेल्यावर दुपारी काॅलेज आपल्याला प्रवेश देणार नाही,या कल्पनेने मैत्रयी बेचैन झाली.तिने वडीलांच्या मित्रांकडून जिल्हाधिका-यांचा मोबाईल नंबर मिळविला.तो जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा व्हाॅट्सअॅप नंबर होता.थेट मॅसेज टाईप केला.मॅसेजमध्ये आपण एम.बी.बी.एस.ची विद्यार्थिनी असून पुढील उद्भवणा-या समस्येबाबत तिने सविस्तर लिहले.मॅसेज पाठवला.मैत्रेयीच्या मॅसेजला अवघ्या दोन मिनिटात जिल्हाधिका-यांनी प्रतिसाद दिला.लॅब आय डी नंबर मागितला.मैत्रेयीने लॅब आय.डी.नंबर व टेस्टिंग मॅसेज फाॅर्वड केला.आश्चर्य म्हणजे अवघ्या तीस मिनीटात खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मैत्रेयीला करोना रिपोर्ट पाठविला.रिपोर्ट निगेटिव्ह होता. मेडिकल विद्यार्थिनीच्या जीवनातला हा अत्यंत सुखद आश्चर्यांचा धक्का होता.मैत्रेयीने जिल्हाधिका-यांचे मनःपूर्वक आभार मानले.जिल्हाधिकारी म्हणाले,टेक -केअर…

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments