Home Uncategorized होय..मी पाळी बोलतेय….

होय..मी पाळी बोलतेय….

नेहमी तुम्ही बोलता ना माझ्याविषयी..

मग आज मलाही बोलू द्या….

होय.. मी पाळी बोलतेय…

वयात आल्यावर प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलीला,

अन प्रत्येक महिलेला येणारी..

मी पाळी बोलतेय..

दर महिन्याला अगदी न चुकता येणारी,

आणि प्रत्येक घरात चर्चित असणारी

मी पाळी बोलतेय..

तुम्ही तर अवाकच झाले असणार??

आज मलाही कसे शब्द फुटले???

हो.. हि वेळ आहेच बोलायची..

माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मागण्याची..

मी तर माझे काम करते..

प्रत्येक महिलेला आई होण्याचे सुख प्रदान करते..

होय मी पाळी बोलतेय..

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

माझी साथ तुम्हाला लागते..

होय..मी पाळी बोलतेय..

प्रत्येक स्त्री हि माझ्याविना अधुरी..

आणि प्रत्येक पुरुषही???

का?? कारण त्याला बाप होण्याचे सौख्य

माझ्याच मुळे लाभते…

होय..मी पाळी बोलतेय..

मग का बरे हा गवगवा…

माझ्या येण्याचा ….??

हिला पाळी आली,तिला पाळी आली,

हिला वेगळे ठेवा..

ह्या बाईला शिवू नये..

आपल्याला विटाळ होतो??

मला तिटकारा आलाय या शब्दांचा..

का बरे विटाळ होतो तुम्हाला माझ्या येण्याचा…??

अरे ज्याच्यामुळे अपुर्णत्वातून पूर्णत्व येत..

त्याचा विटाळ होतो तुम्हाला..??

ज्या पाळीमुळे तुम्हाला आईवडील होण्याचा मान मिळतो..

त्या पाळीचा विटाळ होतो तुम्हाला..??

तुम्ही पुजता ना..दुर्गेला,भवानीला,अम्बामातेला…

त्या सुद्धा स्त्रियाच आहेत..

मग त्यांना जर तुम्ही मंदिरात बसवता..

त्यांची पूजा अर्चा करता..

त्यांचे दर्शन घ्यायला लोळत जाता..

तर मग..

घरच्या स्त्रियांना का वेगळे ठेवता..??

ती सुद्धा भवानिस्वरूप,दुर्गेस्वरूप आहे…

होय मी पाळी बोलतेय..

आपले तर जन्म-जन्मान्तराचे नाते..

माझ्यामुळेच तर स्त्री-पुरुष जन्माला आले..

मग का बरे हा विटाळ..सांगा ..का .. बरे??

अरे कसले गैरसमज घेऊन बसलात डोक्यात…

विटाळ माझ्यात नाही तुमच्या डोक्यात जडलाय..

झटकून टाका त्याला..

जशी तुम्हाला तुमचा जन्म घेण्यासाठी आई हवी असते..

किंबहुना तेवढीच माझीसुद्धा गरज असते..

होय मी पाळी बोलतेय..

मग करा विचार थोडा..

झटकून टाका विटाळ तो खरा..

मी जर नाही आली तर

तुमच्या जन्माचा मार्गच बंद होईल खरा…

जगामधली अतुल्य अशी भेट आहे मी..

तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे मी..

होय..मी पाळी बोलतेय..

मी पाळी बोलतेय..

लाल रंग असणारी मी..

महत्व असू द्या थोडे माझे…

ना कि माझ्यामुळे कपड्यांना पडलेल्या लाल डागाचे…

होय.. मी पाळी बोलतेय…

जगातले सर्वात मोठे सुख देणारी मी..

सुरुवातीला जरी न सांगता आले..

तरी काळजी आणि स्वच्छता हि तुमच्या हातात आहे..

तुमच्या सुखासाठी तुम्ही एवढे तर जरूर कराल..

होय..मी पाळी बोलतेय…

मग करा जागर माझ्या येण्याचा…

ना कि तिटकारा तो माझ्या असण्याचा….

मला सुद्धा मन आहे..मलासुद्धा भावना आहेत..

होय..मी पाळी बोलतेय….

महत्व पटवून सांगा….

विचार तो पक्का करा..

सगळ्या गोष्टींसाठी जगाशी भांडणारे तुम्ही..

आज माझ्यासाठी एवढे करा..

माझ्याविषयी असलेले गैरसमज ..

तेवढे दूर करा..

नैसर्गिक आहे मी…

मला आपलेसे करा…

होय.. मी पाळी बोलतेय….

मी पाळी बोलतेय…

तेजस्वी खेडकर

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments