Home ताज्या घडामोडी हैद्राबाद की भाग्यनगर : योगी आदित्यनाथ आणि ओवेसी आमने-सामने

हैद्राबाद की भाग्यनगर : योगी आदित्यनाथ आणि ओवेसी आमने-सामने

हैद्राबाद

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. “तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही,” असं ओवेसी म्हणाले. एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं.

 

“तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल पण शहाराचं नाव हैदराबादच राहणारआहे. निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हैदराबादच नाव बदलू नये तर एमआयएमलाच मतदान करा,” असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. “ते (भाजपा) नाव बदलू इच्छित आहेत. त्यांना सर्व जागांची नावं बदलायची आहेत. तुमचं नाव बदललं जाईल पण हैदराबादचं नाव बदललं जाणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का?,” असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments