Home ताज्या घडामोडी दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण: अमरावतीच्या न्यु प्रभात कॉलनी परिसरात खळबळ

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण: अमरावतीच्या न्यु प्रभात कॉलनी परिसरात खळबळ

अमरावती 

अवघ्या दिड महिन्याच्या बाळाला एका अज्ञात व्यक्तीने घरातील बेडरूमधून उचलून नेऊन अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 1.30 ते 2 वाजतादरम्यान न्यु प्रभात कॉलनीत घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

या घटनेनंतर राजापेठ पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली. पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या अज्ञात
व्यक्तीची शोध मोहिम सुरु केली आहे. परंतू रात्री 9.30 वाजेपर्यंत पोलिसांना कुठलेही धागेदारे गवसले नव्हते.

एकनाथपुरमजवळील न्यु प्रभात कॉलनीत राहणारे दिलीपसिंह चौहान यांना प्रणव नावाचा एक मुलगा आणि मोठी प्रियंका व लहानी नम्रता नावाच्या दोन मुली आहे. नम्रताचे बिहार राज्य स्थित छपरा जिल्ह्यात सासर असून, तिचा पती मलेश सिंग हे पुणे येथे नोकरीवर असून, ते लॉकडाऊनमुळे बिहारमध्ये घरीच आहेत.  नम्रता ही प्रसुतीसाठी आपल्या माहेरी न्यु प्रभात कॉलनीतील वडिलांकडे आली होती. प्रसुतीनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. गेल्या दिड महिन्यापासून ती वडिलांकडे राहत आहे. दरम्यान रविवार  कुणीतरी अज्ञाताने घरातून तिच्या बाळाला उचलून नेले.

 

दरम्यान बाळाचे आजी आजोबा सुपारी 1 वाजता नावसरी परिसरात लग्नासाठी घरातून निघाले. ते 1.30 वाजेच्यासुमरास नावसरी परिसरात पोचताच त्यांना त्यांच्या घरातून बाळाला चोरून नेल्याचा कॉल येताच ते तसेच घरी परतले.  या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरारील नागरिकांनी लहान बाळाचा शोध घेणे सुरू केले. याबाबत राजापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. श्वानपथकाह पोलीस घटनास्थळी पोचले. रेल्वे पोलिसांसह ग्रामीण पोलिसांनाही या घटनेबाबत सूचित करण्यात आले असून बाळाच्या नातेवाईकांसह पोलीस बाळाचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments