Home ताज्या घडामोडी हरविलेल्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळला

हरविलेल्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळला

अमरावती

न्यु प्रभात कॉलनी परिसरात दिलीपसिंह चौहान यांच्या घरातील बेडरूमधून उचलून नेलेल्या दीड महिन्याच्या बाळाचा मृतदेह घराच्या आवारात असणाऱ्या विहिरीत आढळला.

रविवारी 1.30 ते 2 वाजता दरम्यान न्यु प्रभात कॉलनीत घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राजापेठ पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली असताना सोमवारी पहाटे बाळाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

न्यु प्रभात कॉलनीत राहणारे दिलीपसिंह चौहान यांना प्रणव नावाचा एक मुलगा आणि प्रियंका व नम्रता नावाच्या दोन मुली आहे. नम्रताचे बिहार राज्य स्थित छपरा जिल्ह्यात सासर असून, तिचा पती मलेश सिंग हे पुना येथे नोकरीवर असून, ते लॉकडाऊनमुळे घरीच होते. सद्यास ते बिहारमध्ये आहे. नम्रता ही प्रसुतीसाठी आपल्या माहेरी न्यु प्रभात कॉलनीतील वडिलांकडे आली होती. प्रसुतीनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. गेल्या दिड महिन्यापासून ती वडिलांकडे राहत आहे. दरम्यान रविवारी दुपारी ती बाथरूम मध्ये गेली असता तिचे बाळ पलंगावर नसल्याने तिने हंबरडा फोडला.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी विहिरीतून बाळाचा मृतदेह बाहेर कडून विच्छेदनासाठी पाठवला.पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी न्यु प्रभात कॉलनी परिसरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान दीड महिन्याच्या बाळाला विहिरीत कोणी फेकले असावे हे गूढ कायम असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments