Home ताज्या घडामोडी शिक्षक मतदार संघ निवडणूक :अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

शिक्षक मतदार संघ निवडणूक :अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

अमरावती,

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 77 केंद्रांवर आरोग्य तपासणी पथकांसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती. कोविड-19 ची लक्षणे आढळलेल्या किंवा पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टोकन देऊन दुपारी 4 ते 5 ची वेळ मतदानासाठी देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर विलगीकरण कक्षाचीही सोय करण्यात आली होती. त्यानुसार विभागात एकूण कोविड-19 संशयित आढळलेल्या आठ मतदारांनी दुपारी चार ते पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य पथकाकडून पुरेशी काळजी घेऊन या मतदारांना त्यांचे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात आले. आवश्यक तिथे पीपीईही कीटही उपलब्ध करून देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील मतदान केंद्रावर मतदार असलेल‌्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णालाही टोकन प्राप्त करून देण्यात आले व दुपारच्या निर्धारित वेळेत येऊन या मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य व मतदान पथकांनी पुरेशी खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments