Home ताज्या घडामोडी उत्तरप्रदेशात नेणार फिल्मसिटी! योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल

उत्तरप्रदेशात नेणार फिल्मसिटी! योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल

मुंबई

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे अभिनेता अक्षयकुमारने त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे फिल्मसिटी उत्तरवरदेशात नेणार हा विषय पुन्हा एकदा तापला आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली’, असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सिनेविश्वातील एक कलावंत म्हणून अक्षयकुमार यांची सचोटी, समर्पण आणि सकारात्मकता निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत योगींनी अक्षयकुमारचे कौतुकही या ट्वीटमध्ये केले आहे.

दरम्यान, लखनऊ नगरपालिका बॉण्ड मुंबई शेअर बाजारात एंट्री घेत असून त्याचा लिस्टिंग सोहळा आज सकाळी ९ वाजता मुंबई शेअर बाजार येथे योगींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता ते डीफेन्स कॉरिडोरच्या गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर फिल्मसिटीशी संबंधित गुंतवणूकदार व देशातील आघाडीचे उद्योजक आणि उद्योगसमूहांशीही ते उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई दौऱ्याबाबत ते माहिती देणार आहेत. बुधवारी संध्याकाळीच योगी आदित्यनाथ पुन्हा लखनऊला परतणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments