Home ताज्या घडामोडी तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू.....

तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू…..

मुंबई

आपल्यावर टीका करणार्यामवर उर्मिला मातोंडकर यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत ‘झणझणीत’ ट्वीट केलं आहे. ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, हे गाणे मला खूप आवडते. तुम्हाला काय वाटते?’, असे ट्वीट करत उर्मिला यांनी विरोधक आणि ट्रोलर्सचा खरमरीत समाचार घेतला आहे. उर्मिला यांचं हे ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आहे.

उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर टीका होऊ लागली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली वक्तव्ये, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभारावर केलेली टीका, याचे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उर्मिला यांना पक्षात घेऊन शिवसेनेने पक्षातील लढवय्या महिला कार्यकर्त्यांचंच अवमूल्यन केलं आहे, अशी तोफ दरेकर यांनी डागली आहे. दुसरीकडे उर्मिला यांना सोशल मीडियातही ट्रोल करण्यात येत आहे. या सर्वावर उर्मिला यांनी शिवसेनेच्या स्टाइलमध्येच प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार’ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांनी कामाचा धडाकाही सुरू केला आहे. उर्मिला आज शिवसेना भवन येथे आल्या होत्या. तिथे त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. उर्मिला यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. राज्यपालांकडे जी १२ नावे पाठवली आहेत त्यात उर्मिला यांचेही नाव आहे. या यादीला राज्यपालांची मान्यता मिळाल्यास उर्मिला यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे शिवसेनेने उर्मिला यांना पक्षाची दारे उघडून भाजपला शह दिल्याचेही बोलले जात आहे. अभिनेत्री कंगना राणावत ही शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. शिवसेना नेतृत्वाला कंगना सातत्याने लक्ष्य करत आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी आता उर्मिला या निभावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. उर्मिला यांनी शिवसेनेत नसतानाही कंगनाचा समाचार घेतला होता आणि आता शिवसैनिक म्हणून त्या कंगनाला नक्कीच भिडतील, असेच दिसत आहे

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments