Home ताज्या घडामोडी कोरोना: ब्रिटन पाठोपाठ रशियाचीही लस

कोरोना: ब्रिटन पाठोपाठ रशियाचीही लस

दिल्ली

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे बुधबरी सकाळीच जगभरात जाहीर केल्यावर आता रशियातही पुढच्या आठवड्यात ऐच्छिक लसीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दिले आहेत. रॉयटर्सच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

 

पुतीन यांनी संबंधित विभागाला आदेश देताना म्हटलं की, “देशात पुढील आठवड्यात करोना प्रतिबंधासाठी सार्वजनिकरित्या ऐच्छिक लशीकरणाला सुरुवात करा.” ब्रिटन लसीकरणाला सुरुवात करणारा पहिला देश ठरल्यानंतर आता रशिया लसीकरण करणारा दुसऱा देश ठरला आहे.

रशियात करोनाच्या संसर्गाचे आज ५८९ नव्याने मृत्यू नोंदवले गेले आहेत. पुतीन यांनी म्हटलं की रशिया पुढील काही दिवसांत करोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ चे २० लाख डोस तयार करणार आहे. रशियाने गेल्या महिन्यांत जाहिर केलं होतं की, ‘स्पुटिनिक व्ही’ अंतरिम चाचणीनंतर करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी ९२ टक्के प्रभावी ठरली आहे

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments