Home ताज्या घडामोडी हरवला आनंदवनातला आनंद

हरवला आनंदवनातला आनंद

 

 

सुषमा योगेश कोठीकर

आनंदवन ज्या नावात आनंद आहे त्या ठिकाणी घडलेल्या अतिशय दुःखद आणि विदारक घटनेनं मन हादरून गेलं.क्षणभर वाटलं जी बातमी आपण ऐकतोय ती खोटी असावी काहीतरी चुकीचं पसरवल्या जातंय पण नाही ती घटना ती बातमी सत्य निघाली ह्याचं अतोनात दुःख वाटतंय.काही वर्षांपूर्वी भैयुज्जी महाराज,सुशांतसिंग आणि आता डॉ.शितलताई आमटे किती विदारक चित्र आहे हे!समाजाला जगण्याची दिशा देणाऱ्यांकडून असे निर्णय घेतले गेले यावरून हे सिद्ध होते की तुम्ही जगाला कितीही उपदेश करा पण स्वतःवर वेळ आली तर सगळे उपदेश सगळा ब्रेनवॉश बाजूला सारल्या जातो.आशे पेक्षा निराशा वरचढ ठरून तुमचा बळी जातो.जेव्हा सुसंस्कृत लोकं जे कुणासाठी आदर्श आहेत ते असं कृत्य करतात तेव्हा विषय चिंतनीय होऊन जातो.ज्या मुलीने लहानपणापासून केवळ आपल्या कुटुंबाच्या इच्छा,अपेक्षा भावनांना महत्व दिलं,आपलं जीवन सेवाकार्यात अर्पण केलं अशा शितल ताईंनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवलंच ही घटना प्रश्नार्थक आहे.त्यांच्या अशा अकाली जाण्याने समाजाची खूप मोठी हानी झाली यात शंका नाही.
ज्या भूमीत त्या राहत होत्या त्या भूमीने अनेकांना जगणं शिकवलं आहे.अनेक जीव बाबांच्या महान कार्याने वाचले आहेत जगले आहेत नव्हेतर आजही जगत आहेत.आपण सगळे आनंदवनाचा इतिहास जाणतो ज्या ओसाड उजाड जमिनीवर बाबांनी श्रम करून आनंदवन फुलवलं अनेक महारोग्यांना हक्काचं छप्पर दिलं,जगण्याचा मार्ग दाखवला,कुरुपतेतही सुंदरता आहे हे शिकवलं,हात नाही पाय नाही तरी जग कुठे संपलं नाही हे लोकांना शिकवलं,अनाथांना माय बाप मिळवून दिले,ओसाड जमिनीची कूस सुंदर करून दिली,थीठ्या हातांना बळ दिलं, कमकुवत मनाला प्रबळ केलं अश्या भूमीत जन्माला आलेली कळी आजोबा आणि वडिलांच्या सानिध्यात जगणं शिकत होती आणि इतरांना शिकवत होती तिने असं आनंदवनला पोरकं करणं फार वाईट. स्वतःला आर्टिस्ट बनायचं असूनही डॉक्टर बनून सेवा कार्यात स्वतःला झोकून घेतलं.अनेक सुख पायाशी लोळत असतांनाही सेवा हेच खरं जीवन जीवनाचं ध्येय मानणारी शितलताई का व्यग्र झाली असावी?खूप वाईट वाटतंय ही घटना ऐकली तेव्हा पासून सतत एकच विचार येतोय की मनाने खंबीर असणारी,स्वतःच्या कुटुंबाला आदर देणारी,कुटुंबासाठी आंदनवन साठी स्वतःला वाहून घेणारी ताई अशी अचानक का उदासली?जिथे जीवनाला सुरुवात होते त्या आनंदवनात एका सुंदर मनात आत्महत्येचा विचार येणं खूप अस्वथ करणारं आहे.जगातली सगळी हानी भरून निघते नाव ,संपत्ती,पैसे सगळं काही परत मिळवता येते परंतु निघून गेलेला जीव कधीच परत मिळत नाही.ताई तणावात असेल,दुःखात असेल किंवा इतर काही कारणांनी मन उदासलं असेल पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाने कुटुंबाचं , आनंदवनच आणि समाजाचं जे नुकसान झालंय ते कधीच भरून निघणार नाही.लेकराला आई मिळणार नाही आई बापाला लेक परत मिळणार नाही.एका आदर्श कुटुंबात असा निर्णय म्हणजे विचार क्षमतेला थांबवणारा आहे सुन्न करणारा आहे.त्या निर्णया मागे कारणं काहीही असोत पण ताईचा हा निर्णय नक्कीच योग्य नाही.त्यांनी कुणाशी तरी संवाद करत व्यक्त होणं गरजेचं होतं.मनात उठलेलं काहूर कुठेतरी शांत करणं गरजेचं होतं.जी कारणं त्यांना असे विचार करायला लावत होती तिथून कुठेतरी दूर जाऊन नवीन जीवन नवी सुरुवात करायला हवी होती. जीवन संपवणे हा संकटावरचा नक्कीच मार्ग नाही.ताई तर निघून गेल्या परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांना माफ करून आपल्या पदरात घेवो ही प्रार्थना करते.कुणाच्याही मनात असे जीवन संपवण्याचे विचार येत असतील तर त्यांनी हजार वेळा आपल्या कुटुंबाच्या जन्मदात्या आईचा विचार करावा ज्या आईने स्वतःचा जीव पणाला लावून तुम्हाला जन्म दिला जीवन दिलं आपलं जीवन संपवताना तिची परवानगी घेणं तिचा विचार करणं गरजेचं आहे.आपले श्वास हे आपल्या माता पित्यांचे आपल्यावरचे उपकार आहेत ते उपकार अश्या पध्दतीने फेडू नका.जगातली सगळी दुःख एकीकडे आणि तरुण संततीचं असं निघून जाणं एकीकडे.

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments