Home ताज्या घडामोडी अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष किरण सरनाईक यांना आघाडी

अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष किरण सरनाईक यांना आघाडी

अमरावती

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे हे पिछाडीवर असून आश्चर्यकारकरीत्या वाशीमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार दुसºया फेरीत किरण सरनाईक यांना पहिल्या पसंतीची 6073 मते मिळाली असून श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या पसंतीची 5132 मते मिळाली आहेत. विद्यमान आमदार असलेले श्रीकांत देशपांडे हे पिछाडीवर गेल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
येथील विलासनगर परिसरातील शासकीय गोदामात गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीत १४ हजार पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी झाली. त्यात अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेले अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी सर्वाधिक ३ हजार १३१ मते मिळवून आघाडी घेतली होती. दुसºया क्रमांकावर शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना २ हजार ३०० मते मिळाली होती. तर शिक्षक महासंघाचे शेखर भोयर हे २ हजार ७८ मते मिळवून तिसºया स्थानावर होते. तर भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांची सातव्या स्थानी घसरण झाली होती.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच ८६.७३ टक्के इतके विक्रमी मतदान झाले, त्यातच शिवसेना (महाविकास आघाडी) आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने होते. शिक्षक संघटनांसाठी ही लढाई अस्तित्वाची असल्याने त्याही ताकदीने मैदानात होत्या. पण, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विज्युक्टाच्या उमेदवारांना मागे सारून अन्य नवीन शिक्षक संघटनांच्या उमेदवारांनी या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.
सकाळी ८ वाजता दोन कक्षांमध्ये १४ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा या प्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्र करण्यात आल्या. ४० गठ्ठे मिळून एक हजार मतांची मोजणी प्रत्येक टेबलावर करण्यात आली. प्रथम पसंतीक्रमाच्या मतांनुसार मतपत्रिकांचे वर्गिकरण करण्यात आले. पहिल्या फेरीचे निकाल दुपारी ३ वाजताच्या सुमारास हाती आले. नंतर दुसºया फेरीची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांच्या मोजणीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसºया पसंतीक्रमाची मतमोजणी हाती घेतली जाते. तीच शक्यता वर्तवण्यात येत असून अंतिम निकाल लागण्यास बराच विलंब लागेल, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments