Home ताज्या घडामोडी माताच वैरीण; बाळाला विहिरीत फेकणाऱ्या आईला अटक

माताच वैरीण; बाळाला विहिरीत फेकणाऱ्या आईला अटक

अमरावती

दीड महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकणारी माताच पोटच्या गोळ्यावजी वैरीण असल्याचे स्पष्ट झाले असून बाळाची हत्या केल्याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि बयाणांच्या आधारे बाळाची आई नम्रता मनिषसिंग परमार हिला गुरुवारी अटक केली.

30 नोव्हेंबर रोजी न्यु प्रभातकॉलनीतील दिलीप चौहान यांच्याच घराच्या आवारातील विहिरीत धैर्यसिंगचा मृतदेह आढळून आला होता. चार दिवसाच्या चौकशीनंतर राजापेठ पोलिसांनी अखेर या हत्याप्रकरणात ठोस पाऊल उचलले.

घटनेच्या दिवशी बाळ धैर्यसिंगची आई आणि मामा हे दोघेच घरी होते. त्यामुळे संशयाची सुई या दोघांवरच होती. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी मामा व आईची कसून चौकशी केली. पोलिसांनी 11 सदस्यांचे बयाण नोंदविले. परंतू बाळाच्या हत्येचा उलगडा झाला नाही. धैर्यसिंगचे वडिल मनिषसिंग परमार यांचे बयाण नोंदविणे बाकी होते. त्यांच्या बयाणातून काही नवीन तत्थे समोर येईल, असे पोलिसांना वाटले. 3 डिसेंबर रोजी मनिषसिंग परमार अमरावतीत पोहोचले. त्यांचे बयाण पोलिसांना नोंदविली. सर्वांच्या बयाणांची पोलिसांनी पडताळणी केली असता, बयाणांमध्ये तफावत आढळून आली. घरात दोघेचे असताना बाहेरील कुणी घरात शिरला नाही. नम्रता ही 1 मिनीटाकरिता बाथरुमला गेली होती. दरम्यान धैर्यचे अपहरण झाले. ही बाब संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानुसार पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळावरची स्थिती लक्षात घेता आरोपी नम्रताला अटक केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments