Home ताज्या घडामोडी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक : किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक : किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वाशीमच्या किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विद्यमान आमदार आणि महाविकास आगजाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभूत करून दणदणीत विजय मिळविला आहे.

 

निवडणूक रिंगणात 27 उमेदवार होते. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली ती शुक्रवारी रात्री 8 ला संपली. पहिल्या फेरीपासूनच किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली. अखेरीस 25 वा उमेदवार शेखर भोयर बाद झाल्याबर त्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमात श्रीकांत देशपांडे यांच्या पेक्षा किरण सरनाईक यांना अधिक पसंती क्रम मिळसल्यावर आधीच आघाडीवर असणाऱ्या किरण सरनाईक यांनी एकूण 3 हजार 342 मतांची आघाडी घेत बाजी मारली. सरनाईक यांना 12 हजार 433 मतं मिळाली तर श्रीकांत देशपांडे यांना 9 हजार 191 शिक्षकांनी पसंती दर्शविली.

प्रत्येक शिक्षकाचा मी प्रतिनिधी

आता निवडणूक संपली.माझे त्यांचे असा फरक मी शिकांच्याबाबत करत नाही. सर्व शिक्षकांचा मी प्रतिनिधी आहे. सगळ्यांच्या अडचणी सोडविणे ही माझी जबसनदारी आहे. माझी आई आमदार होती आणि मावशी पण आजन्म आमदार राहिली आहे. सामाजिक कसर्याचा वारसा मला लाभला असून मी माझ्या सर्व शिक्षकांच्या हितासाठी काम करणार अशी प्रतिक्रिया किरण सरनाईक यांनी विजयानंतर दिली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments