Home ताज्या घडामोडी बाळाची विहिरीत टाकून हत्त्या : आरोपी आईला तीन दिवसांची पोलीस कोठडी

बाळाची विहिरीत टाकून हत्त्या : आरोपी आईला तीन दिवसांची पोलीस कोठडी

अमरावती

पोटच्या गोळ्याला विहिरीत टाकून त्याची हत्त्या केल्याचा आरोप असणाऱ्या आईला जिल्हा सत्र न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असताना आता तीन दिवसंच्या पोलीस कोठडी दरम्यान बाळाच्या आईकडून हे कृत्य का केले यासह इतर अनेक महत्वपूर्ण माहिती पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
अमरावती शहरातील न्यु प्रभात कॉलनी परिसरात राहणारे दिलीप चौव्हन यांची धाकटी मुलगी नम्रता हिच्यावर स्वतःचे दीड महिन्याचे बाळ विहिरीत टाकून त्याची हत्त्या केल्याचा संशय आहे. 29 नोव्हेंबरला दिलीप चौहान हे पत्नीसह एका लग्नसोहळ्यात गेले असता दुपारी 1.20 वाजे दरम्यान नम्रताचे दीड महिन्याचे बाळ हरवल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणात सर्वत्र शोध मोहीम राबविली असताना नम्रताचे बाळ घराच्या चव्हाण यांच्या घराच्या अंगणात असणाऱ्या विहिरीत आढून आले होते. यानंतर बाळाला त्याच्या आईनेच विहिरीत टाकल्याचा संशय पोलिसांना आला आणि तिची चौकशी सुरू झाली. 4 डिसेंबरला राजापेठ पोलिसांनी नम्रता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. शनिवारी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments