Home महाराष्ट्र मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी : यशोमती ठाकूर

मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी : यशोमती ठाकूर

अमरावती

मृदेचे कृषी क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम तालुका बीज गुणन केंद्र,धानोरा गुरव (ता नांदगाव खंडेश्वर) येथे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे , किटकशास्त्रज्ञ पी. सिंग, अनिल ठाकूर, अनिल खर्चान ,श्रीमती प्रीती रोडगे,उपविभागीय कृषी अधिकारी,राहुल माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मृदसंवर्धन दिन
हा केवळ औचित्य म्हणून साजरा न करता त्याची लोकचळवळ झाली पाहिजे. रासायनिक खतांचा संतुलित वापर व सेंद्रिय शेतीपद्धतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने गावोगाव प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले .

गावातील व परिसरातील प्रगतीशील शेतकरी व महिला गटाच्या शेतकरी सदस्या उपस्थित होत्या. मृद तपासणी व जमीन आरोग्य पत्रिका बाबत घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चवाळे यांनी, सूत्रसंचालन सीमा देशमुख यांनी केले. प्रीती रोडगे यांनी आभार मानले .

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments