Home ताज्या घडामोडी संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करूया :ऍड. यशोमती ठाकूर

संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करूया :ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवतेची महान मूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहेत. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसा निश्चय व निर्धार नागरिक म्हणून आपण सर्वांनी करूया.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, किशोर बोरकर, अशोक दहिकर, ज्येष्ठ पत्रकार ऍड. दिलीप एडतकर, नाना नागमुखे, उमेश घुरडे, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, राजकुमार मून, कमलताई कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments