Home ताज्या घडामोडी 'त्याने' चोरले 3 लाख 43 हजार रुपयांचे मोबाईल फोन; पोलिसांनी केली अटक

‘त्याने’ चोरले 3 लाख 43 हजार रुपयांचे मोबाईल फोन; पोलिसांनी केली अटक

अमरावती
अमरावती शहरात विविध भागात लोकांच्या घरात शिरून मोबाईल फोनची चोरी करणारा अट्टल चोरटा गडगेनागर पोलिसांनी पकडला आहे. त्याने विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या मोबाईल फोनची किंमत 3 लाख 43 हजार रुपये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वैभव नारायण आडोळे असे चोरट्याचे नाव असून तो मोर्शी तालुक्यात येणाऱ्या येरला गावातील रहिवासी आहे. अमरावती शहरात बापटवडी परिसरात त्याने भाड्याची खोली घेऊन तिथे चोरी केलेले मोबाईल फोन ठेवले होते. नागपूर येथून त्याने 60 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरली होती ती सुद्धा गडगेनागर पोलिसांनी रविवारी जप्त केली.


घरात घुसून मोबाईल चोरणाऱ्या वैभव आडोळेचा शोध गत काही दिवसांपासून पोलीस घेत होते. सूत्रांनी त्यांच्याबाबत माहिती देताच पोलीस आयुक्त आरती सिंह आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मर्गदर्शनत गाडगे नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेर्तृत्वत डी.बी. पथकाचे महेश इंगोले, शेखर गेडाम, सुभाष पाटील, सतीश देशमुख, विशाल वाकपंजार, रोशन वऱ्हाडे यांनी वैभव आडोळेचा बापट वाडी येथील खोलीवर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्याच्या जवळ असणारे मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments