Home ताज्या घडामोडी बी.एड् प्रवेश पात्रता परीक्षा: करूणा शर्मा राज्यात प्रथम

बी.एड् प्रवेश पात्रता परीक्षा: करूणा शर्मा राज्यात प्रथम

अमरावती

बी.एड् प्रवेश पात्रता परीक्षेत (स्टेट काॅमन एंट्रेंस टेस्ट) स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची पदव्युत्तर विज्ञान शाखेची विद्यार्थिनी करूणा जयकिशन शर्मा राज्यात सर्वप्रथम आली आहे.गणित विषयात एम.एस.सी केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणा-या करूणाने महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा दिली.या परीक्षेत 150 गुणांपैकी तिने 126 गुण प्राप्त करीत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकविला.करूणाचे वडील गणेशदास राठी विद्यालयात कार्यरत असून आई किरण गृहिणी आहेत.अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवणा-या करूणाच्या या घवघवित यशाबद्दल शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राध्यापक वृंद,माजी एस.बी.आय .ए जी.एम.श्री.पुरूषोत्तम शर्मा,माजी डिजीएम श्री.नवलकिशोर शर्मा आणि शर्मा कुटूंबियांनी अभिनंदन केले आहे.शिक्षण क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ अॅड.जुगलकिशोर शर्मा यांची करूणा पुतणी आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments