Home ताज्या घडामोडी भारतातील शेतकरी आंदोलनाचे लंडनमध्ये पडसाद; भारतीय दुतावासाबाहेर आंदोलन

भारतातील शेतकरी आंदोलनाचे लंडनमध्ये पडसाद; भारतीय दुतावासाबाहेर आंदोलन

लंडन

कृषी कायदा २०२० विरोधात भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद थेट ब्रिटनमध्ये उमटले आहे. ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकल्याने खळबळ उडाली आहे.

भारतीय उच्चायोगाने सांगितलं की, “हा गंभीर प्रकार आहे. कारण करोना महामारीदरम्यान भारतीय उच्चायोगासमोर ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. सुमारे ७०० वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. उच्चायोगाला याची माहिती होती की, लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली नव्हती तसेच या आंदोलनासाठी ४० वाहनांची परवानगी घेण्यात आली होती.

एएनआयच्या माहितीनुसार, या आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनाबरोबरच भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.दरम्यान, या मोठ्या आंदोलनाची ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची दखल घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी काही समाजकंटकांना ताब्यातही घेण्यात आले. उच्चायोगाने सांगितलं की, ते या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे. विनापरवानगी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित कसे झाले यासह इतर सर्व पैलूंबाबत चौकशीही केली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments