Home ताज्या घडामोडी शेतकरी कायद्याला विरोध; युवक काँग्रेसने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा

शेतकरी कायद्याला विरोध; युवक काँग्रेसने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा

अमरावती

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.

युवक कोंग्रेस कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून शेतकरी विरोधी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली असता, आमदार सुलभा खोडके यांनी आंदोलनात सहभाग घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.पोलिसांनी रोखल्याने उडाला गोंधळ -युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणलेले प्रतिकात्मक प्रेत पोलिसांनी हिसकावून घेतले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने यावेळी गोंधळ उडाला.
दरम्यान हरियाणा, राजस्थान अशा विविध भागातून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यात आले. हा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय असून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे काहीही ऐकून न घेता मनमानी करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचे आंदोलन कायम राहणार आहे, असेही युवक काँग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. निलेश गुहे, सागर देशमुख, संकेत कुलट आदी कार्यकर्ते या आमदोलनात सहभागी होते.

- Advertisment -

Most Popular

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...

अन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट

पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

Recent Comments