Home विदर्भ पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदुर्गांचा गौरव; सरपंच सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदुर्गांचा गौरव; सरपंच सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम

अमरावती

ग्रामविकासाची धुरा वाहणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

सरपंच सेवा महासंघ व सरपंच माझा चॅनल नवदुर्गा उपक्रमाद्वारे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांना पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राहुल उके, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुकुंद पुनसे, गजानन देशमुख, ज्योतीताई अवघड, भारती मोहोकार, शिल्पा तायडे, सविता आहाके, अर्चना पखाले, नंदकुमार गोडगे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राजकीय, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनीही कधीतरी राजकारणापलीकडे जाऊन एकत्र येऊन काही उपक्रम राबवणे आवश्यक असते. त्यामुळे सरपंच सेवा संघ व सरपंच माझा वाहिनीने एकत्र येऊन राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सरपंच महिलाभगिनींचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments