Home ताज्या घडामोडी अमरावती बंद: महाविकास आघाडीने काढला मोर्चा

अमरावती बंद: महाविकास आघाडीने काढला मोर्चा

अमरावती
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. अमरावती शहरातील मुख्यबाजारपेठ आज बंद होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्यावतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

राजकमल चौक येथून महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला . आमदार सुलभा खोडके, माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, संगीता ठाकरे, राजेंद्र महल्ले, सुनील वऱ्हाडे,शिवसेनेचे सुनील खराटे, काँग्रेसचे किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत यांच्या नेतृतावत राजकमल चौक येथून मोर्चा काढण्यात आला. गांधीचौक, इतवरा बाजार, जवाहरगेट, जयस्तंभ येथून इर्विन चौकापर्यंत हा मोर्चा निघाला. मोर्चादारे आज दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन व्यवऱ्याना करण्यात आले. बंद असतानाही जी दुकानं सुरू होती ती बंद करण्यात आली. जयस्तंभ चौक येथे राष्टापिता महात्मा गांधी यांना मोर्चातील नेत्यांनी अभिवादन केले. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चादरम्यान शहरात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments