Home ताज्या घडामोडी मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या; चांदूरबाजर शहरात खळबळ

मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या; चांदूरबाजर शहरात खळबळ

अमरावती

जिल्ह्यातील चांदूरबाजर शहरात गुलाबराव महाराज नगर येथे सोमवारी रात्री एस एम देवांग यांच्या घराजवळ ३५ वर्षीय महिला आपल्या मुलासोबत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले होती. उपचारा दरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासामध्ये अखेर त्या आईनेच आपल्या विकलांग मुलाला मारून स्वतःची जीवन यात्रा संपवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
माधुरी गजानन शिंगणपूरे (३५) व तिचा अपंग मुलगा ऋषी शिंगणपूरे (१०) असे मायलेकाचे नाव आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड गावात रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली.
आपल्या संसाराला कंटाळून सदर महिला आपल्या अपंग मुला घेऊन अमरावती येथून बस ने चांदुर बाजार मध्ये दाखल झाली. वीजपुरवठा खंडित झाला असताना सदर महिला गुलाबाबाब नगर मध्ये गेली. तेव्हा या भागातील देवांग यांचा घराबाहेर आपल्या मुलाच्या गळ्यावर ब्लेड ने वार केले. तसेच स्वतःचा हातावर व मानेवर ब्लेड मारून स्वतःचे जीवनही संपवले.
पोलिसांनी घटना स्थळावरून लेडीज बॅग , मोबाईल जप्त केले. घटनास्थळी सापडलेल्या बॅगमध्ये मोबाईल व अमरावती चांदुर बाजार एस टी बस ची तिकीट वाढल्याने मृतकाची ओळख पटली होती. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेला मोबाइल वरून नातेवाईकांशी संपर्क केला. यावेळी मृतक महिलेची आर्णी येथील बहिणीकडे महिलेने मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. रात्री वेळाने दोन्ही मृतकांचे नातेवाईक पोलीस स्टेशन ला पोहचून ती चिट्ठी पोलिसांना दिली.
त्या चिट्ठी नुसार मृतक महिला आपल्या सांसारिक जीवनाने कंटाळली असून मुलगा विकलांग असल्याने त्रस्त होऊन जीवन संपवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांनी मृतक महिला माधुरी गजानन शिंगणपुरे यांचा विरोधात भा द वी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील किणगे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, वीरेंद्र अमृतकर, महेश देशमुख करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments