Home ताज्या घडामोडी दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अमरावती

अवघ्या दीड महिन्याचा बाळाला विहिरीत टाकून त्याची हत्त्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयाच्या आधारावर बाळाच्या आईला अटक केली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत मी गुन्हेगार नाही या म्हणण्यावर बाळाची आई ठाम होती. आज तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
29 नोव्हेंबरला न्यु प्रभात कॉलनी परिसरात दिलीपसिंह चौहाण यांची धाकटी मुलगी नम्रता हिचे अवघे दीड महिन्याचे बाळ घरातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. नम्रताचे बाळ चव्हाण यांच्या घराच्या आवारात असणाऱ्या विहिरीत आढळून आल्यावर पोलिसांनी घटनेच्यावेळी घरात असणाऱ्या नम्रता आणि तिच्या लहान भावावर संशय आला. दोघांचीही चौकशी केल्यावर पोलिसांनी नम्रताला अटक केली. न्यायालयाने नम्रताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी तीन दिवस नम्रताची कसून चौकशी केली मात्र तिनेच बाळाला मारले हे स्पष्ट होऊ शकले नाही.
दरम्यान बाळाच्या डीएनए चाचणीसाठी नम्रता आणि तिच्या पतीचे रक्त घेण्यात आले आहे. नम्रताची नार्को चाचणी कडण्याची तयारीही पोलीस करीत आहेत. नम्रताची रवानगी आता अमरावती मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. या प्रकरणात नेमक कोण दोषी आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसल्याने दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ अद्यापही कायम आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments