Home ताज्या घडामोडी हिंमत असेल तर सिंचनावर बोला; भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका

हिंमत असेल तर सिंचनावर बोला; भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका

अमरावती

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
नौटंकी सम्राट बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याची एकही बैठक नाही. पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषग्रस्त झाला आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी मूठमाती दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहेत. शेतकऱयांची दुरवस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे. हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.
मेळघाटातील गडगा प्रकल्प 150 कोटीहून 450 कोटीहून पोहचला. राणापिसा आणि हिराबंबई प्रकल्प ठप्प आहे. मेळघाटात बच्चू कडूच्या प्रहार संघटनेचा आमदार आहे. मात्र, हे प्रकल्प ठप्प आहेत. पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप होऊन वर्ष झाले मात्र, नागरी सुविधांची कामे झालेली नाही. तेव्हापासून महत्वाकांक्षी पेढी प्रकल्प ठप्प आहे. बच्चू कडूंच्या बेलोरा या स्वतःच्या गावचा सिंचन प्रकल्प रखडला आहे. त्यांच्या मतदारसंघातील पांढरी, बोरडी, वासनी, राजुरा सर्व प्रकल्प कुलूपबंद आहेत. बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेर धामना, पूर्णा बॅरेज, नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात लोवर पैनगंगा आणि खर्डा तर बुलढाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पाचे काम थांबले आहे. शाश्वत पाणी साठा हीच खरी शेतकऱयांची पुंजी आहे. शेतकऱ्यांचा कळवळा दाखवण्यासाठी नौटंकी करणारे बच्चू कडू पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्री मंडळात मूग गिळून गप्प बसले आहेत. अनुशेषग्रस्त विदर्भातील शेतकऱ्याची दुरवस्था असताना त्यांच्या बांधा पर्यंत पाणी पोहचवण्याची नैतिक जबाबदारी बच्चू कडू यांची आहे. सिंचन प्रकल्पांची कामे ठप्प असल्याने आणि मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने विदर्भातील पैसा पश्चिम महाराष्ट्रात वळता केला जातो, त्या विरोधात चकार शब्द काढण्याची बच्चू कडू यांची हिंमत नाही. मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी लाचारी पत्करणारे बच्चू कडू घरातला अंधार दूर न करता दिल्लीत उजेड पाडायला निघाले असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
अनुशेषासंदर्भात दांडेकर समितीच्या अहवालाव्दारे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये असलेला सिंचन विकास क्षेत्राचा अनुशेष निश्चित केला होता. शिल्लक असलेला 2,34,019 हेक्टर भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी 102 प्रकल्पांचा समावेश असलेला “सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम” राज्यपालांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला होता. याअनुशेष निर्मूलन कार्यक्रमातील 102 प्रकल्पांपैकी 55 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 45 प्रकल्प रखडले आहेत. हे पूर्णत्वास नेण्यासाठी बच्चू कडू यांनी उजेड पाडलेला नाही. हे प्रकल्प ठप्प असल्याने उर्वरित 1,60,766 हेक्टर अनुशेष कसा दूर होणार याचे उत्तर राज्यातील महाविकास आघाडीने दिले पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. कर्जमाफीचा लाभ नाही. आणि बांधावर पाणी मिळावे यासाठी बच्चू कडू बोलत नाहीत. या पार्शवभूमीवर त्यांनी नौटंकी थांबवावी, असे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments