Home Uncategorized 10 डिसेंबर : राशीभविष्य

10 डिसेंबर : राशीभविष्य

मेष : सहकारी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपण महत्वाचे निर्णय घेणे टाळावे. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.

वृषभ : घराची स्वच्छता करण्यासाठी जोडीदाराला मदत करावी लागेल. व्यावसायिक वाढीसाठी महत्वाचे पत्रव्यवहार कराल. आपल्या व्यक्तिमत्वाचा जनसमुदायावर सामाजिक ठिकाणी चांगला प्रभाव पडेल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.

मिथुन : नोकरीतील एखाद्या चांगल्या कामाची पूर्तता झाल्यामुळे सहकार्यांना मेजवानी द्यावी लागेल. आज आपल्याकडूनवरिष्ठ जादा कामाची अपेक्षा करतील. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील.

कर्क : व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढणार्या घटना घडतील. आपले काम पूर्ण व्हावे म्हणून व्यावसायिक मतभेद टाळावेत. आर्थिकउलाढालींबाबतचे निर्णय पुढे ढकलावेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.

सिंह : शिक्षणासाठी बाहेर राहणारी आपली मुले आपल्याला भेटतील. त्यांच्याकडून आज आपणास सुवार्ता समजतील.वास्तूविषयी प्रश्नासंबंधी आज आपली कुटुंबियांशी चर्चा होईल. आपली मते डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.

कन्या : महत्वाची कामे सकाळीच करून घ्या. संध्याकाळी मित्रपरिवाराबरोबर मेजवानीच्या बेतात सहभागी व्हावे लागेल.मित्रमैत्रिणींना आर्थिक सहाय्य कराल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील.

तूळ : आपले अंदाज अचूक येतील. कुटुंबातील त्रीवर्गाच्या दृष्टीने भाग्यकारक घटना घडतील. आपल्या अपेक्षित गाठीभेटीतून व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने शुभ घटना घडतील. व्यावसायिक शुभारंभ होतील. अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल.

वृश्चिक : आपले मनोबल उंचावणार्या घटना घडतील. व्यावसायात वाढ करण्यासाठी परप्रांतीय व्यक्तिंशी संबंध वाढवावे लागतील. आपली कामे लवकरच मार्गी लागतील. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल.

धनू : नोकरीत आपल्या कामामध्ये एखाद्या सहकार्यामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. आर्थिक घडामोडींच्या दृष्टीनेआजचा दिवस अनुकूल नाही. संततीच्या प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

मकर : नाकेरीत पूर्वी कबूल केलेल्या गोष्टीची वरिष्ठ पूर्तता करतील. वाहने चालताना सावधगिरी बाळगा. आपले अंदाज आज अचूक ठरतील. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.

कुंभ : वैवाहिक जीवनात, मतभेद होण्याची शक्यता राहते. भागिदारीत व्यवसाय करणारांना सावधगिरी बाळगावी लागेल.कोणताही महत्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तिचा सल्ला घ्यावा. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल.

मीन : आपल्या परदेशस्य नातेवाईकांची ख्यालीखुशाली समजेल. आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.आपल्या भाग्योदयाच्या दृष्टीने अनुकूल घटना घडतील. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments