Home ताज्या घडामोडी शेवती लघु सिंचन तलावाच्या भूसंपादनाला वाढीव मोबदला

शेवती लघु सिंचन तलावाच्या भूसंपादनाला वाढीव मोबदला

पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई

अमरावती जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव शेवती, मौजे शेवती या प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या प्रकरणात व्याजाची देय रक्कम रु ७१.३२ लाख आणि भूसंपादनाचा वाढीव मोबदला रु.३१.८० लाख अशी एकूण एक कोटी तीन लाखाचा निधी वितरित करण्य़ासाठीचा शासन निर्णय़ निर्गमित करण्यात आला आहे. तब्बल २३ वर्ष प्रलंबित असलेला विषय मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

लघु सिंचन तलाव शेवती, मौजे शेवती ता जि अमरावती या प्रकल्पाकरिता संपादीत केलेल्या जमीनीच्या भुसंपादन प्रकरणी मा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच भूसंपादन कलम २८ क अंतर्गत वाढीव मोबदला देण्याचा निर्णय झाला आहे. व्याजाची देय रक्कम रु ७१.३२ लाख आणि भूसंपादनाचा वाढीव मोबदला रु.३१.८० लाख अशी एकूण एक कोटी तीन लाखाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याने १९९७ पासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागल्याने सामान्यांचा फायदा होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments