Home ताज्या घडामोडी शेवती लघु सिंचन तलावाच्या भूसंपादनाला वाढीव मोबदला

शेवती लघु सिंचन तलावाच्या भूसंपादनाला वाढीव मोबदला

 

  अँड यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

अमरावती

जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव शेवती, मौजे शेवती या प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या प्रकरणात व्याजाची देय रक्कम रु ७१.३२ लाख आणि भूसंपादनाचा वाढीव मोबदला रु.३१.८० लाख अशी एकूण एक कोटी तीन लाखाचा निधी वितरित करण्य़ासाठीचा शासन निर्णय़ निर्गमित करण्यात आला आहे. तब्बल २३ वर्ष प्रलंबित असलेला विषय मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

लघु सिंचन तलाव शेवती, मौजे शेवती ता जि अमरावती या प्रकल्पाकरिता संपादीत केलेल्या जमीनीच्या भुसंपादन प्रकरणी मा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच भूसंपादन कलम २८ क अंतर्गत वाढीव मोबदला देण्याचा निर्णय झाला आहे. व्याजाची देय रक्कम रु ७१.३२ लाख आणि भूसंपादनाचा वाढीव मोबदला रु.३१.८० लाख अशी एकूण एक कोटी तीन लाखाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याने १९९७ पासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागल्याने सामान्यांचा फायदा होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments