Home देश राज्यमंत्री बच्चू कडू याना उत्तरप्रदेश सीमेवर रोखलं

राज्यमंत्री बच्चू कडू याना उत्तरप्रदेश सीमेवर रोखलं

भरतपूर
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी बच्चू कडू यांचा ताफा धौलपूर सीमेवर रोखलं.

राज्यमंत्री बच्चू कडू हे ग्वाल्हेरहून पलवल येथे जाण्यासाठी निघाले. भरतपूर मार्गे ते पलवल येथे जात होते. पण यूपी पोलिसांनी त्यांना रोखलं. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर धौलपूर येथे पोलिसांना पुढे जाण्यास मनाई केली. अग्रा आणि पुढील काही भागात चक्का जाम असल्याचं कारण उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलं. पोलिसांनी त्यांना पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितलं. पण दिल्ली जणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना रस्त्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून समर्थन मिळत आहे. यामुळे पोलिसांना त्यांना रोखल्याचं बोललं जातंय. बच्च कडू यांना रात्रीचा मुक्कामक भरतपूरमध्ये करावा लागला. आता आज ते हजारो समर्थकांसह पलवलला रवाना होतील, असं सांगण्यात आलं.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments