Home वन मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्वेच्छेने ५० रक्त दात्यांनी केले रक्तदान

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्वेच्छेने ५० रक्त दात्यांनी केले रक्तदान

धारणी

राज्यात केवळ एका दिवसाचा रक्तसाठा शिल्लक असल्याचे व मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रक्तदान करण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील, गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ढाकणा वनपरिक्षेत्रात 50 जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी तसेच गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वन विभाग व मेळघाट व्याघ्र प्रकल्प वने व वन्यजीव यांच्या संरक्षण व संवर्धना बाबत नेहमीच अग्रेसर राहिला आहे त्यात आता रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य होताना दिसते आहे. मेळघाटातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल विरळ लोकवस्ती असल्याने 20-25 लोक रक्तदान करतील अशी आशा होती परंतु हिरालाल चौधरी यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत;ढाकणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संरक्षण कुटीवरील मजूर, चौधरी सरांच्या मित्रपरिवारा सोबतच विशेष अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे ढाकणा, सावर्या, भांडूम, दाभिया, बोरीखेडा या गावातील तरूणांनानी व ग्रामस्थांनी देखील रक्तदानात सहभाग घेतला; ज्यामुळे रक्तदात्यांची संख्या 50 वर गेली. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे ही भावना त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होती. कोरोणाच्या काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात लोकांनी जो रक्तदानाचा उत्साह दाखवला तो नक्कीच कौतुकास पात्र आहे. यापुर्वी देखील दि 31 मे रोजी कोरोना काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रात रक्तदान घेण्यात आले होते. रक्तदानाची चळवळ मेळघाट क्षेत्रात रुजावी याकरिता प्रयत्न करीत असल्याचे हिरालाल चौधरी यांनी सांगितले त्यांनी आज 28 व्या वेळी रक्तदान केले. तसेच 33 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अवयव दानाचा संकल्प केल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर रक्तदानात शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय रक्त पेढी अमरावती व उपजिल्हा रुग्णालय, धारणी व त्यांच्या पूर्ण टीमचे, तसेच सामाजिक कार्यकर्ते पवन भावसार, सुमीत चौथमल, रोहित पाल, सुरज मालवीय,पंकज मोरे, वन्यजीव प्रेमी डॉ. प्राजक्त राऊळ, मनिष ढाकुलकर, कपिल बोरकर, सर्व सेवाभावी संस्था आणि अधिकारी ,कर्मचारी, ग्रामस्थ मजूर बंधू यांचे एवढ्या मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व सहकार्या बद्दल ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने अभिनंदन केले व आभार मानले तसेच या संकट समयी सर्वांनी शक्य तिथे रक्तदान करण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments