Home ताज्या घडामोडी डॉक्टरने केला महिलेवर वाहनात बलात्कार

डॉक्टरने केला महिलेवर वाहनात बलात्कार

अमरावती
आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन महिला रुग्णावर एका डॉक्टरने वाहनातच लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना 7 डिसेंबर रोजी एसआरपीएफ क्वॉर्टरसमोरील चांदुररेल्वे रोडवर घडली. 9 डिसेंबर रोजी पिडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी डॉ. लच्छुराम जाधवानी (48 रा. ताजनगर) याचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

26 वर्षीय महिला उपचारासाठी नेहमी डॉ. लच्छुराम जाधवानीकडे जात होती. त्यामुळे डॉक्टरला महिलेच्या परिस्थितीबद्दल माहिती होती. 7 डिसेंबर रोजी महिलेला बरे वाटत नसल्यामुळे ती डॉ. जाधवानी यांच्या दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी तपासणी करून बीपी वाढल्याचे कारण सांगितले. तुम्हाला कशाचे टेंशन आहे, असे डॉक्टरने विचारल्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे काम नसल्याचे महिलेने सांगितले. त्यावेळी माझा मित्र व्याजाने पैसे देऊ शकते, परंतू त्यासाठी कॅम्प परिसरात जावे लागले, असे डॉक्टरने महिलेला सांगितले. त्यानंतर महिला महापालिका शाळा क्रमांक 13 जवळ थांबली असता, डॉ. जाधवानी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने तेथे पोहोचले. त्यात महिलेला बसवून घेतले. सकाळपासून उपाशी असाल, असे म्हणून महिलेला नास्ता दिला. एका बॉटलमधील पाणी प्यायला दिले. परंतू पाणी पिल्यानंतर महिलेला गुंगी आली. त्यानंतर डॉ. जाधवानीने कॅम्पकडील मित्राकडे जात असल्याचे सांगून एसआरपीएफ पोलिस क्वॉर्टरसमोरील रोडवर अंधारात गाडी थांबविली. त्यानंतर डॉ. जाधवानीने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडिताने तक्रारीतून केला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments