Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात जीन्स टी शर्टवर बंदी

महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात जीन्स टी शर्टवर बंदी

मुंबई

महराष्ट्र शासनंतर्गत असणाऱ्या मंत्राल्यासह राज्यतील सर्व शासकीय कार्यलयाय जीन्स पॅट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची वेशभूषा शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे
8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेबाबत परिपत्रक काढले आहे.शासकीय कार्यालयात खासदार, आमदार , नगरसेवक आदी लिकप्रतिनिधी , सर्वसामान्य नागरिक , खासगी संस्थांचे प्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी भेट देतात.अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनधी म्हणून शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.वेशभूषेतून ते कार्यरत असलेल्या व्यवस्थापनेची एक विशिष्ट छाप पडतात.त्यामुळे शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि ऊशभूषेबद्दल जागरूक राहावे आणि कार्यालयास किमान अनुरूप ठरेल याची सर्वंकष काळजी घ्यावी.असे शासन परिपत्रकात नमूद आहे.

असा असावा पेहराव


महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार, चुडीदार,कुर्ता, ट्राउझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.

पुरुष कर्मचऱ्यानी शर्ट, पॅन्ट, ट्राउझर पॅन्ट असा पेहेराव करावा.
गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहेराव करू नयेत.जीन्स पॅन्ट, टी शर्टचा वापर करू नये.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments