Home विदर्भ ड्रेस कोड च्या शासन परिपत्रकाचा जाहिर निषेध

ड्रेस कोड च्या शासन परिपत्रकाचा जाहिर निषेध

अमरावती

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड बाबत धोरण निश्चित केले असून, काही कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर आक्षेप घेत शासनाने हा ड्रेस कोड बाबतचा निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. या अर्थ जसे विशिष्ट पोषाख घालून जे लोकसभा सदस्य स्वत;च हस करून घेताता त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नेऊन ठेवल आहे अस म्हटल्यास हसू येणार नाही याची काही गॅरंटी नाही. शासनाच्या वरिल बाबी संबधाच्या परिपत्रामधील दोन क्रमाकांच्या परिच्छेदा मध्ये कंस करून लिहल्या गेल आहे की कंत्राटी कर्मचार, सल्लागार यांच्या पेहरावा मुळे शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. या बाबी वरुन जि. प. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी प्रदिप बद्रे यांना तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन तुघलकी निर्णयाचा समाचार घेतला आहे.

याबाबत प्रदीप बद्रे म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज पर्यन्त शासन सेवा देताना कोणत्याही प्रकारची मर्यादा ओलांडली नाही व या पुढे कधी पण ते ओलांडणार नाही. आमचा कर्मचारी कधीही चित्रविचीत्र पेहराव परिधान करत नाही. तो शासकिय चाकोरीचे काटेकोर पालन करातो. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर राज्यशासन व केंद्रशासन ऐवढा माज करत ते कोणामुळ शक्य झालं. आज देश व राज्य हागणदारीमुक्त आहे कोणामुळ ? प्रत्येक घराला नळा व्दारे शुध्द पिण्याचे पाणी. कोणाच्या जिवावर देणार ? देशात नरेगा योजना केंद्र स्थानी आहे कोणा मुळ ? प्रत्येक बेघराला घर कोणाच्या जिवावर देणार ? कचरा / घाणमुक्त देश कोणाच्या जिवावर ? कंत्राटी कर्मचारीच ना आणि त्यांनाच या परिपत्रकानुसार तुश्च पणाची वागणूक देण्यात येत आहे. सरकारला हे शोभत नाही. आमचा ड्रेस कोड ला विरोध नाही. आम्ही स्वत;च या गोष्टीचे सर्मथक आहोत.

शासनाने कंत्राटीकरण लादल, आणि आता त्यांच्या डोळ्यात खुपतय.

शासन परिपत्रकामध्ये जी परिस्थिती नमूद आहे ती मला नाही वाटत कुठल्याही जिल्हा परिषद मध्ये अस्तित्वात असेल, किंवा जिल्हास्तरावर कुठल्याही कार्यालयात अशी स्थिती असेल असे वाटत नाही. ही जी परिस्थिती नमूद आहे ही मंत्रालय स्तरावर असल्याचे जाणवते. कारण शासनाने अनेक विभागाचे खाजगीकरण केले आहे अनेक ठिकाणी बाहेर संस्थेमार्फत कर्मचारी नेमले आहेत. आता त्या कंपनीचा मालक / सीईओ जर 25–28 वर्षाचा एखाद्या उद्योगपती चा पोरगा असेल तर तो जीन्स, टी-शर्ट आणि जागोजागी भोक पाडून घेतलेला / कापलेल्या पँन्ट असं घालून येणार नाही तर मग काय घालेल. अशा कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला अगदी तंग टी-शर्ट घालून जीन्स पॅन्ट घालून अर्ध अंग उघडे करून जर मंत्रालयात येत असेल तर याला तुम्हीच जबाबदार आहात. त्यासाठी सरकार आमच्या सारखे अनेक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत त्यांना दोषी धरणार काय ? हा कळीचा मुद्दा आहे. याबाबत राज्य सरकारने त्वरित खुलासा सादर करून जिल्हास्तरावर अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेय. याबाबत दिलगिरी व्यक्त करावी आणि सदरच्या परिपत्रकांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करावी अशी मागणी आमची संघटना करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments