Home ताज्या घडामोडी शेतकऱ्यांचे आज चलो दिल्ली आंदोलन; उद्या उपोषण

शेतकऱ्यांचे आज चलो दिल्ली आंदोलन; उद्या उपोषण

नवी दिल्ली

 नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषणावर बसणार आहेत.

आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले. आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते कंवलप्रीतसिंग पन्नू यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत घेतली

राजस्थानातील शहाजहाँपूर येथून हजारो शेतकरी जयपूर- दिल्ली महामार्गावरून रविवारी सकाळी ११ वाजता ‘दिल्ली चलो’ आंदोलनास सुरुवात करतील, असे पन्नू यांनी सांगितले. देशाच्या इतर भागांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘‘सरकारला चर्चा करायची असेल, तर आम्ही तयार आहोत. मात्र हे तिन्ही कायदे रद्द करण्याची आमची मुख्य मागणी कायम असेल. त्यानंतरच इतर मागण्यांबाबत विचार केला जाऊ शकतो,’’ असेही पन्नू यांनी स्पष्ट केले.

नव्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबरला सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपोषण करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारने आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकऱ्यांनी तसे होऊ दिले नाही. हे आंदोलन शांततेने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीला असलेले संरक्षण नष्ट होईल. तसेच बाजार समितीची यंत्रणाही मोडीत निघून शेतकऱ्यांना मोठय़ा कंपन्यांच्या दयेवर राहावे लागेल, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे वातावरण गढूळ करण्यासाठी काही ‘समाजकंटक’ तसेच ‘डावे आणि माओवादी’ घटक कारस्थान रचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यासपीठाचा गैरवापर न होऊ देण्याबद्दल दक्ष राहावे, असे आवाहन सरकारने शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांना केले होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments