Home Uncategorized अमरावतीत राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये 675 प्रकरणांचा निपटारा

अमरावतीत राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये 675 प्रकरणांचा निपटारा

अमरावती

जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीत 675 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या लोकअदालतीत वाहन अपघात नुकसानभरपाई, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकांची प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विवादसंबंधी कायद्याचे दावे, बँकेचे, तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे आदी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.

लोकअदालतीतील प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 29 मंडळांची निर्मिती करण्यात आली. त्यात न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच न्यायालयीन कर्मचा-यांचा समावेश होता. लोकअदालतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून 3 हजार 706 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 675 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण पाच कोटी 33 लाख 83 हजार 360 रूपये रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला. पती व पत्नी असे वादी-प्रतिवादी असलेल्या चार प्रकरणांवरही या लोकअदालतीतून सामंजस्यपूर्वक तोडगा काढण्यात आला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष उर्मिला एस. जोशी-फलके व सचिव ए. जी. संताणी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत यशस्वीरीत्या पार पडली. 000

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments