Home ताज्या घडामोडी देशात आणीबाणीपेक्षाही परिस्थिती भयंकर : उद्धव ठाकरे

देशात आणीबाणीपेक्षाही परिस्थिती भयंकर : उद्धव ठाकरे

मुंबई

कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असताना ठाकरे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. राज्यात जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज नाही. कोणालाही अघोषित आणीबाणी असल्यासारखे वाटत नसताना फडणवीस यांना तसे वाटते. मग देशात काय घोषित आणीबाणी सुरू आहे का? शेतकऱ्यांशी चर्चा न करता आधी त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले. हे काय सद्भावनेचे लक्षण आहे काय? असा सवाल ठाकरे यांनी के ला. केंद्र सरकारने काहीही के ले तर चालते का? त्यांच्या कारभारावर टीका करणाऱ्यांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांद्वारे कारवाई होते. ‘ईडी’, सीबीआयसारख्या यंत्रणा भाजपच्या घरगडय़ासारख्या वापरल्या जात आहेत. आणीबाणी हा शब्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभतो, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

कामगार कायदे, कृषी कायदे करून कामगारांची, शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. पण न्याय्यहक्कासाठी कोणी बोलले की त्याला देशद्रोही ठरवले जाते. शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या नेत्यांनी एक काय ते ठरवावे. कधी शेतकरी आंदोलकांना डावे म्हटले जाते, कधी खलिस्तानी म्हटले जाते, कधी पाकिस्तान व चीनचे पाठबळ असल्याचे सांगतात. न्याय्यहक्कासाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्याला देशद्रोही ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. देशातील जागरूक जनता हे सर्व बघत असून त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये. असला तुघलकी कारभार देशातील जनता सहन करणार नाही, असे ठाकरे यांनी सुनावले. शेतकऱ्यांच्या हिताची नसलेली कृषी कायद्यांतील एकही गोष्ट महाविकास आघाडी सरकार स्वीकारणार नाही, असेही ठाकरे यांनी जाहीर के ले.

शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवायचे आणि पाकिस्तानातून कांदे-साखर आयात करायचे काम केंद्रातील भाजप सरकार करत असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी के ली. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असती तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा इतक्या घसघशीत मताधिक्याने विजय झाला असता का, असा सवाल करत अजित पवार यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. तसेच भाजपच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांचा चेहरा पडलेला होता याकडे लक्ष वेधत भाजपच्या नेत्यांना नैराश्य आल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

राज्यपालांना विधान परिषदेतील १२ जागांच्या नियुक्तीचा अधिकार आहे. पण मर्जीप्रमाणे तो वापरला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या राज्यांत विधान परिषद आहे त्या सर्वानी मिळून याबाबत चर्चा करण्याची गरज आहे. नियुक्ती करण्याला कालावधी का नसावा, असा सवाल करत यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकारण करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचित केले.

केंद्र शासनाने थकवले महाराष्ट्राचे २८ हजार कोटी थकीत

केंद्रातील भाजप सरकारने ‘एक देश, एक कर’ म्हणून वस्तू व सेवा कर आणला. पण त्यातील तरतुदींची नीट अंमलबजावणी होत नाही. जीएसटीत येणाऱ्या तुटीची भरपाई दरमहा केंद्र सरकारने करायला हवी. उलट दरमहा थकबाकी वाढतच जात असून महाराष्ट्राचे २८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने थकवले आहेत. राज्य सरकारने टाळेबंदी शिथिलीकरण सुरू के ल्यानंतर पूर्वीपेक्षा महसूल परिस्थिती सुधारत असली तर अजूनही दरमहा सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची तूट उत्पन्नात येत आहे. तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, एसटीसाठी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटी रुपये अशारीतीने तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकार पैसे उपलब्ध करून देत असून अडचणीतून मार्ग काढत आहोत, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments