Home ताज्या घडामोडी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसचे "जवाब दो"आंदोलन

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसचे “जवाब दो”आंदोलन

अकोला

देशभरातील शेतकरी पेटलेला असताना, भाजप चे खासदार, मंत्री, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत . याचा जाब विचारण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे ह्यांच्या घरावर आज “जवाब दो” आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव सागर देशमुख यांनी मुंडन करून संजय धोत्रे यांचा निषेध नोंदविला.

युवक कॅांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे ह्यांच्या आदेशानुसार राज्यभरात भाजप खासदार व केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्या घरासमोर आंदोलन करून आपण शेतकऱ्यांविषयी का बोलत नाही? असा जाब विचारण्यात येणार आहे.

 

 

या वेळी युवक कॅांग्रेस च्या शेकडो कार्यकर्त्यांनी संजय धोत्रे ह्यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. आंदोलकांना संजय धोत्रे यांच्याकडुन अधीकृत उत्तर मिळाले नाही. याचा निषेध म्हणून सागर देशमुख यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून संजय धोत्रे यांचा निषेध केला. सागर देशमुख यांचे मुंडण आंदोलन स्थळी चर्चेचा विषय ठरला. त्या मुळे जो पर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तो पर्यंत आम्ही येथुन हलणार नाही असा पवित्रा घेऊन युवक कॅांग्रेस कार्यकर्ते अधीक आक्रमक झाले. ह्या वेळी पोलीसांनी युवक कॅांग्रेस पदाधीकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे प्रदेश महासचिव राहुल येवले दर्यापूर विधानसभा अध्यक्ष सागर देशमुख निखिल कोकाटे अभिनव देशमुख यशवर्धन काळे प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत,सागर कावरे, सागर देशमुख, राहुल येवले, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, प्रदेश सचिव ऍड. विवेक गावंडे, राम डहाके,श्रेयस इंगोले, अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे,वाशिम जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, विद्यार्थी कॅांग्रेस चे प्रदेश महासचिव आकाश कवडे, अंकुश पाटील, मिलींद झामरे, नितीन चिंचोळकर, आकाथ सिरसाट आदी सहभागी झालेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments