Home महाराष्ट्र बडनेरा रेल्वेस्थानकावर 'चाईल्डलाईन' सेवा

बडनेरा रेल्वेस्थानकावर ‘चाईल्डलाईन’ सेवा

अमरावती

हरवलेल्या, भरकटलेल्या लहान मुलांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने बडनेरा रेल्वे स्थानकावर आजपासून चाईल्डलाईन सेवा सुरू झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या सेवाकेंद्रांची पाहणी केली.

 

चाईल्डलाइन 1098 हा महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार व चाईल्डलाइन इंडिया फाऊंडेशन, मुंबई यांच्या समन्वयाने ‘काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी’ मोफत, 24 तास (रात्र -दिवस) संपूर्ण भारतात उपलब्ध असलेली तातडीची टोल फ्री फोन सेवा आहे. भारत सरकारच्या ‘एकात्मिक बाल संरक्षण योजने’ अंतर्गत ही सेवा कार्यरत असून बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार संकटात सापडलेल्या बालकांसाठी (वय वर्ष 18 पूर्ण नसलेल्या) काळजी व पुनर्वसनात्मक सेवा पुरवते. जिल्हाधिकारी हे ‘चाईल्डलाइन अ‍ॅडव्हायझरी बोर्डचे’ अध्यक्ष म्हणून या प्रकल्पाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेत असतात. त्याच अनुषंगाने आज भेट आयोजित करण्यात आली होती.
या भेटीदरम्यान त्यांनी चाईल्डलाइन स्टाफ व इतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

रेल्वे स्टेशन परिसरात जनजागृतीसाठी चाईल्डलाइनचे पोस्टर लावावेत तसेच या आपत्कालीन सेवा लहान मुलाप्रमाणे गरजू महिला व पुरुषांसाठीही उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

 

याप्रसंगी बडनेरा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक मनीष सिन्हा, श्रीमती वंदना चौधरी, बाल कल्याण समिती अध्यक्ष अंजली गुलक्शे, बाल न्याय मंडलाचे सदस्य माधव दंडाळे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अजय डफळे, सिटी चाईल्ड लाईन
समन्वयक फाल्गुन पालकर,आणि दिशा संस्थेचे संचालक प्रवीण खांडपासोळे, ज्योती खांडपासोळे, समन्वयक मनीष आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments