Home ताज्या घडामोडी प्रजासत्ताकदिनाला घातपात ! गुप्तचर यंत्रणेने दिला सतर्कतेचा इशारा

प्रजासत्ताकदिनाला घातपात ! गुप्तचर यंत्रणेने दिला सतर्कतेचा इशारा

दिल्ली

प्रजासत्ताक दिनी भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती रिसर्च अँड अॅनेलेसिस विंग अर्थात ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. यासाठी भारतातून फरार झालेला मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक हा एका नव्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवत आहे, असं ‘रॉ’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

टाइम्सनाऊ च्या वृत्तानुसार, पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टर इस्लामिक संघटनेने या स्फोटांचा कट रचला असून काही रोहिंग्यांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमध्ये हे स्फोट घडवले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२१ पूर्वी हेहल्ले होण्याची शक्यता असल्याचंही यात म्हटलं आहे. दिल्ली, अयोध्या, बोधगया, श्रीनगर, चंदीगड आणि पश्चिम बंगालमधील महत्वाचं शहर यांना यासाठी टार्गेट करण्यात येणार आहे.

दरम्यान, मलेशियास्थित रोहिंग्यांच्या गटाला यासाठी आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. दोन लाख अमेरिकन डॉलर इतका पैसा यासाठी पुरवण्यात आल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. झाकिर नाईक आणि मलेशियातील रोहिंग्यांचा नेता मोहम्मद नसीर यांनी हे कारस्थान रचलं आहे. चेन्नईतील एका व्यक्तीला यासाठी परदेशातून पैसाही मिळाला आहे. म्यानमारमध्ये यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिला हे हल्ले घडवून आणतील त्या महिला नेपाळ आणि बांगलादेशातून भारतात प्रवेश करतील, असंही ‘रॉ’ने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments