Home ताज्या घडामोडी शेतकरी आंदोलनवरून मोबाईल फोन कंपन्यांमध्ये उफाळला वाद

शेतकरी आंदोलनवरून मोबाईल फोन कंपन्यांमध्ये उफाळला वाद

मुंबई

शेतकरी आंदोलन उफाळून आले असताना मोबाईल फोन कंपन्यांमध्ये एकएमकांविरुद्ध वाद उफाळून आला आहे. रिलायन्स जिओकडून स्पर्धक कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलविरोधात
कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिलायन्स जिओकडून दूरसंचार नियामक मंडळाला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं आहे. व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल चुकीचा मार्ग स्वीकारत असून नव्या कृषी कायद्यांमुळे जिओचा फायदा होत असल्याची खोटी अफवा पसरवत असल्याचा आरोप रिलायन्स जिओकडून करण्यात आला आहे.

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चा निष्पळ ठरल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम असून कृषी कायदे रद्द व्हावेत ही मागणी धरुन लावली आहे.

दरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पाठवलेल्या पत्रात जिओने स्पर्धक कंपन्याकडून वेगवेगळ्या मोहीम चालवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. ११ डिसेंबर रोजी रिलायन्स जिओकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे. “मोठ्या प्रमाणात ग्राहक नंबर पोर्ट करण्याची मागणी करत असून हे एकमेव कारण देत आहेत. त्यांची सेवेशी संबंधित किंवा इतर कोणतीही तक्रार नाही”.

जिओने केलेल्या आरोपांना एअरटेलने उत्तर दिलं असून हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. “आमचे काही स्पर्धक निराधार आरोप करत असून डावपेच आखत आणि वर्तनातून आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही अभिमान वाटेल अशा पद्दतीने आणि पारदर्शकपणे व्यवसाय करत आहोत, ज्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं एअरटेलने निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं आहे. व्होडोफोन आयडियानेही जिओचे आरोप फेटाळले असून नैतिकतेच्या आधारे आम्ही व्यवसाय करत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments