Home ताज्या घडामोडी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांना गावबंदी

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांना गावबंदी

अमरावती

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक आचासंहिता सुरू असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आता त्यांचे शासकीय वाहन कोणत्याही गावात नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद कार्यालय ते शासकीय निवासस्थान या दरम्यानच त्यांना या वाहनांचा उपयोग करता येणार आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिले आहे.

 

जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असल्याने याची आंचारसंहिता ही संपुर्ण जिल्ह्यातच लागू राहणार आहे.कोठेही आचारसंहीतेचा भंग होवु नये याकरिता प्रशासनाकडुन सर्तकता बाळगली जात आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि चारही विषय समितीचे सभापती यांना देखील त्यांचे शासकीय वाहन वापर करतेवेळी अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांचे वाहन कोणत्याही गावात नेण्यास आचारसंहिता काळात बंदी असुन, केवळ जिल्हा परिषद कार्यालय ते त्यांचे शासकीय निवास्थानापर्यंत या वाहनांचा वापर करता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असुन या आदेशावरून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी पदाधिकाऱ्यांना वाहन वापरण्याबाच्या सुचनाचे पत्र दिले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments