Home ताज्या घडामोडी सकारात्मक विचारांची रुजवणुक करण्यासाठीच चांगुलपणाची चळवळ : डॉ.अरुंधती भालेराव 

सकारात्मक विचारांची रुजवणुक करण्यासाठीच चांगुलपणाची चळवळ : डॉ.अरुंधती भालेराव 

अमरावती

समाजात बऱ्याच काही गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीकोणातून पाहण्यात येतो. त्यामुळे मानवाच्या, समाजाच्या पर्यायाने राष्ट्राच्या उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात. हे सर्व अडथळे दुर करून राष्ट्राला उन्नत करण्यासाठी सकारात्मक विचारांची रुजवणुक करणे गरजेचे असल्याचे मत माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून चालविण्यात येणाऱ्या चांगुलपणाची चळवळ या मोहीमेच्या प्रवक्त्या डॉ. अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केले.
डॉ. अरुंधती भालेराव ह्या बुधवारी अमरावती शहरात आल्या असता, त्यांनी  पत्रकारांशी चर्चा करून डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या संकल्पनेसंदर्भात आपले विचार व्यक्त केले.
डॉ. अरुंधती भालेराव म्हणाल्या की, परराष्ट्र विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रनिर्माणाकरीता सकारात्मक विचारांचे प्रेरणास्त्रोत म्हणून चांगुलपणाची चळवळ नावाने मोहीम सुरु केली आहे. आजच्या घडीला लोकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोन नकारात्मक झालेला आहे. राजकारणी म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेचा दुरउपयोग अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगले लोक राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचे टाळतात. मात्र राजकीय नेता हाच समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याने राजकीय क्षेत्राला दुर्लक्षीत करून चालता येणार नाही. राष्ट्राच्या उन्नती व विकासामध्ये राजकीय लोकांची महत्वाची जबाबदारी असते. ही जबाबदारी योग्यरितीने पार पाडण्यासाठी समाजातील सर्वच क्षेत्रातील चांगल्या लोकांनी हिरारीने राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने चांगुलपणाची चळवळ या मोहीमेचे अनन्यसाधारण महत्वाचे महत्व असल्याचे डॉ. अरुंधती भालेराव यांनी सांगितले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची आपुलकीची चळवळ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात गेल्या दिड वर्षापासून विविध स्तरावर सामाजिक उपक्रम राबवून सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करीत आहे. गाव दत्तक घेवून गावातील गरीबी दुर करण्यासाठी प्रयत्न करणे, गाव अथवा शहरातील परिसर स्वच्छ करण्यासाठी स्थानिकांचा सक्रीय सहभाग वाढविणे, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, अनाथ आश्रम व वृध्दाश्रमातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे, विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या लोकांना, संस्थांना प्रोहत्साहीत करणे, झोपडपट्टी अथवा मागास वस्त्यांमधील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून त्यांना शिक्षणासाठी प्रेरीत करणे, बचत गट व ग्राहक संघटनांमध्ये समन्वय निमाळ करून बचतगटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा विविध स्तरावर चांगलुपणाची चळवळ राबविण्यात येत आहे.
या मोहीमेअंतर्गत कोल्हापुर, सांगली, सातारा,मुंबई, ठाणे, नागपुर या परिसरात चांगली कामे करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात २ गावे दत्तक घेण्यात आली असून त्या गावांमधील उसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा सुरू करण्यात आली आहे. या चळवळीशी राज्यभरातून जवळपास ५ ते ६ लाख लोक जुळल्या गेले असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ यांच्यापासून डॉ. अच्युत गोडबोले यांच्यासारखी मोठी माणसे या चळवळीसाठी काम करीत आहेत. अशा मान्यवरांच्या सहभागामुळे ही चळवळ अधिक व्यापक होत असून ती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे डॉ. अरुंधती भालेराव यांनी यावेळी सांगितले.
समाजात जर चांगले बदल घडवून आणायचे असतील तर त्याकरीता सत्तेची शक्ती हातात असणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्राच्यामाध्यमातूनच सत्ता मिळविणे शक्य आहे. त्याकरीता सर्वच क्षेत्रातील चांगल्या लोकांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोरोनासंकटामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः युवा वर्ग मानसिकदृष्टया खचलेल्या अवस्थेत आहे. त्यांना आशेचा किरण दाखविण्यासाठी समाजातील या लोकांनी कार्य करण्याची गरज असल्याचे डॉ. अरुंधती भालेराव यांनी यावेळी सांगितले.

विदर्भात मुहर्तमेढ

चांगुलपणाची चळवळ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. आता ही चळवळ विदर्भात रुजवायची आहे. त्याचा श्री गणेशा आजपासून करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सकारात्मक विचारांच्या लोकांनी या चवळवळीत सहभागी होवुन राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपला हातभार लावावा असे आवाहन डॉ. अरुंधती भालेराव यांनी यावेळी केले.

न्याय, स्वातंत्र्य व समता प्रस्थापित होईल

देशाच्या संविधानात अभिप्रेत असलेली न्याय, स्वातंत्र व समता प्रस्थापित करण्यासाठी चांगुलपणाची ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्याकरीता समाजातील सकारात्मक विचारांच्या लोकांनी एकत्रित येवून कार्य करण्याची गरज आहे. चांगुलपणाच्या चवळवळीच्या माध्यमातून अशा लोकांना एकत्रित करण्याचे काम करण्यात येत आहे. शासन व राजकीय नेत्यांना सोबत घेवून सर्व सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ही चळवळ काम करीत आहे. राजकीय पक्ष कोणताही असो, मात्र चांगले लोक राजकारणात आले पाहीजे हीच आपली भुमिका आहे. या चळवळीच्यामाध्यमातून राष्ट्र आणि समाज यांच्यातील दुवा अधिक घट्ट व्हावा याकरीता युवकांनी या चळवळीत हिरारीने सहभाग घ्यावा असे आवाहन चांगुलपणाची चळवळ या मोहीमेचे चे प्रणेते डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी यावेळी साधलेल्या व्हिडीओ संवादाच्या माध्यमातून केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments