Home ताज्या घडामोडी करण जोहरला समन्स ; ड्रग्स प्रकरण

करण जोहरला समन्स ; ड्रग्स प्रकरण

मुंबई

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीने समन्स बजावलं आहे. याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान यांसारख्या अभिनेत्रींचाही समावेश होता. आता करण जोहरला समन्स बजावलं गेल्यानंतर त्याच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाललाही समन्स बजावलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करते आहे. या प्रकरणात एनसीबीला आता करण जोहरकडून माहिती हवी आहे.

करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात एनसीबीकडे एक तक्रार आली आहे. ज्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार करण जोहरला या समन्सला उत्तर देण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. पण करण जोहरने ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत एनसीबीला सहकार्य करावे अशी अपेक्षा असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसंच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे. आता या प्रकरणात एनसीबीला करण जोहरकडून माहिती हवी आहे आणि त्याने यासाठी सहकार्य करावं असंही एनसीबीने स्पष्ट केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती. मात्र ७ ऑक्टोबरला तिला जामीन मंजूर करण्यात आला. आता ड्रग्ज प्रकरणात करण जोहरची चौकशी झाल्यानंतर त्यातून काय सत्य बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments