Home ताज्या घडामोडी कोरोनामुक्तीत भारत अव्वल

कोरोनामुक्तीत भारत अव्वल

दिल्ली
भारताचा करोना रिकव्हरी रेट महा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक कोरोनामुक्तीत भारत अव्वल असल्याची
माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, केंद्रासोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा परिणाम भारतात सातत्याने करोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत राहिला तर वेगाने करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला.

दरम्यान, जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

दररोजच्या आकडेवारीनुसार, भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं हे उच्च आहे. त्यानुसार, बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या जवळपास ९५ लाख आहे. त्याचबरोबर बरे होणारे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्ण यामध्येही सातत्याने वाढ होत आहे. आजवरची ही संख्या ९१,६७,३७४ इतकी आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments