Home Uncategorized वेबसिरीज एक सामाजिक प्रदूषण !

वेबसिरीज एक सामाजिक प्रदूषण !

 

सुषमा योगेश कोठीकर

पूर्वी मनोरंजनाचं एकमेव असं चॅनल होत डी डी नॅशनल ज्यावर येणारे विविध कार्यक्रम संपूर्ण परिवारासहित बसून बघता येत होते.रात्रीचं जेवण तर हमखास टी व्ही समोर बसून केलं जायचं ज्यात पूर्ण परिवार एकत्र बसत होता.लहान बालकांपासून तर मोठ्या लोकांना आवडतील असे विविध मनोरंजक माहितीपूर्ण कार्यक्रम बघायला मिळत होते.हळूहळू तंत्रज्ञानाचा विकास झाला केबल सुरू झालं.नवनवीन चॅनल वरून वेगवेगळे कार्यक्रम दिसू लागले चॅनलची व्याप्ती वाढू लागली झी टी व्ही, स्टार प्लस फेमस झालं कहाणी घर घर की बनून गेलं.
आज एकविसाव्या शतकात आम्ही अजून तंत्रज्ञान विकसित केलं आणि मनोरंजनाच्या शाखा अजून विस्तारीत झाल्या.ज्यात इंटरनेट सारखा विषय घराघरात पोहचला हातात स्मार्टफोन आले आणि जग जिंकल्याची अनुभूती घेत आम्ही मानव गर्वात जगू लागलो.संपूर्ण जग हातातल्या त्या मोबाईल मध्ये सामावून गेलं.युट्यूब आणि त्यासारख्या तत्सम अँपवरून अनेक व्हिडीओ बघायला मिळू लागले काही मनोरंजक तर काही माहितीपूर्ण तर काही अगदीच अशाकाहारी. ज्ञानाच्या कक्षा जितक्या रुंदावल्या तितका स्मार्टफोन आणि टी व्ही देखील अधिकाधीक स्मार्ट झाले.काही महिन्यांपासून वेबसिरीज युगाला सुरुवात झाली.
या वेबसिरीज बघण्यासाठी वेगवेगळे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड होऊ लागले.धकाधकीच्या जीवनात टी व्ही समोर बसायला वेळ कमी मिळू लागल्यामुळे सगळं काही मोबाईल मधून बघण्याची अती सवय झाली आहे जी सवय तरुणांमध्ये अगदीच टोकाची आहे.फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्विटर,व्हाट्सअप, टेलिग्राम च्या जगात वेबसिरीज धुमाकूळ घालत आहे.बरं ह्या वेबसिरीजचा काहीच विरोध नाही परंतु ज्याप्रकारच्या त्या आहेत त्या प्रकाराचा मुळात विरोध आहे.तरुणाईला आजरी बनवण्याचं काम ह्या वेबसिरीज करत आहेत ह्यात शंका नाही.बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या ह्या वेबसिरीज बघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ज्यात तरुणाईचा समावेश जास्त आहे.सामाजिक प्रदूषण वाढविण्याचं काम ह्या वेबसिरीज करतआहेत.मनोरंजनातून समाज प्रबोधन ह्या पाया असणारी भारतीय संस्कृती लयास नेण्यास ह्या वेबसिरीजचा मोठा वाटा तयार होतोय.आधीच संस्कार आणि संस्कृतीला न जुमानणाऱ्या पिढ्यांपासून पालकांनी हात टेकले आहेत त्यात हे असले अंग प्रदर्शन करणारे,उत्तेजित करणारे आणि चुका करायला भाग पाडणारे मनोरंजन समाज विघातक आहे यात तिळमात्र शंका नाही.भरकटलेल्या युवा पिढीला खड्यात टाकण्याचं काम ही माध्यमे करत आहेत.ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी संस्था सुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधून आहे.समाज विघातक ह्या कार्यक्रमांना मान्यता देतांना कोणते निकष लावतात देव जाणे!मनोरंजनांच्या नावाखाली सुरू झालेलं हे सामजिक प्रदूषण कुठेतरी थांबायला हवं.ह्या वेबसिरीज एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर धर्म आणि जातीवर बोट ठेवत विशेष धर्माला घेऊन धार्मिक संस्कृतीला देखील गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत.सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीवर काय,शिक्षक काय,डॉकटर्स काय सगळ्यांना अगदीच खालच्या पातळीवर दाखवणारे कार्यक्रम आवडीने बघितल्या जात आहेत ही शोकांतिका आहे.हे असले सिरीयल आणि वेबसिरीज समाजाला काय आदर्श देत आहेत ? हे सगळं थांबायला हवं.अन्यथा अनेक पिढ्या बरबाद होतील.

 

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments